शिर्डीच्या पशुप्रदर्शनात देवणी वळू अव्वल!

आणखी पाहा...!

शिर्डी येथे महाराष्ट्र सरकार मार्फत महा एक्स्पो अंतर्गत पशुप्रदर्शन झाले.

या प्रदर्शनात लातूर जिल्ह्यातून पशुपालक सहभागी झाले होते. 

हासगेवाडी येथील गाय व वळू यांनी प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधले. 

बालाजी जाधव यांच्या गाय व वळूला प्रथम पारितोषिक मिळाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते 51 हजार व सन्मान चिन्ह देण्यात आले.

बालाजी जाधव यांची तिसरी पिढी देवणी गोवंशाच्या पालन करते.

जाधव यांच्या घरी गाय व बैल असे 15 हून अधिक गोवंश आहेत.

देशभरातील पशुप्रदर्शनात 40 हून अधिक पारितोषिके मिळवली आहेत. 

हासेगाव वाडीची देवणी गाय व वळूसाठी वेगळी ओळख निर्माण झाली आहे. 

देवणी गोवंशाला मराठवाड्यासह परराज्यातूनही मागणी आहे. 

देवणी गोवंश अधिक ताकदवान मानला जातो. 

देवणी गाय दुधासाठी तर बैल शेती कामासाठी वापरतात.