दुबईच्या बिर्याणीचा घ्या बदलापुरात आस्वाद!
बिर्याणी म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते.
गेल्या काही काळापासून सोशल मीडियावरही बिर्याणी चांगलीच ट्रेण्ड होत आहे.
ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमधल्या एका हॉटेलमध्ये चक्क दुबईच्या पद्धतीची बिर्याणी तयार केली जाते.
बदलापूरच्या विनायक फुलवरे या तरूणानं त्याच्या हॉटेलमध्ये दुबई स्पेशल बिर्याणी उपलब्ध करुन दिलीय.
विनायक हा शेफ असून त्याने दुबईमध्ये एका प्रतिष्ठित हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करत होता.
लॉकडाऊननंतर मायदेशी परतल्यावर स्वतःच काय तरी सुरू करायचं या दृष्टीने त्यानं 'बदलापूर फूड एक्सप्रेस' हे हॉटेल सुरू केलं.
शेफ असल्यामुळे जेवण बनविण्याची आवड आणि पद्धत माहित होती. दोन वर्ष दुबई येथे काम केलं होतं.
त्यामुळे मुंबईत दुबईमधील शेख तसंच अन्य नागरिकांना आवडणारी बिर्याणी आपल्याकडं मिळत नव्हती. त्यामुळे मी दुबई स्पेशल बिर्याणी तयार केली.
आमच्याकडे चिकन बिर्याणी, मटण बिर्याणी, व्हेज बिर्याणी असे वेगवेगळे प्रकार आहेत.
व्हेज बिर्याणी 700 रू. किलो, चिकन बिर्याणी 800 रू. किलो, मटण बिर्याणी 1200 रू. किलो
असून महिन्याला सुमारे 300 किलोच्या जवळपास बिर्याणी बदलापूर परिसरात विक्री होते, अशी माहिती विनायक यांनी दिली.