असं असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर
उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील भव्य राममंदिराचं काम वेगाने सुरू आहे. पहिल्या टप्प्यातील 65 टक्के काम पूर्ण झालं आहे.
सध्या ग्रह मंडप आणि सिंहद्वाराचं काम सुरू आहे.
गर्भगृहाच्या मागील भाग ज्याला महापीठ म्हटलं जातं तेसुद्धा जवळपास तयार झालं आहे.
मंदिरात लावले जाणारे स्तंभही तयार झाले आहेत.
या स्तंभांची यांची उंची 20 फूट आहे.
याशिवाय रामाच्या पुतळ्यामध्ये बोटे, चेहरा आणि डोळे कसे असावेत यावर देशातील महत्त्वाच्या शिल्पकारांनी मंथन सुरू केले आहे.
मात्र ट्रस्टनुसार रामाची मूर्ती साडेआठ फूट उंच आहे. ती तयार करण्यासाठी 5 ते 6 महिने लागतील.
मंदिर हजारो वर्षे सुरक्षित ठेवण्यासाठी रिटेनिंग वॉल बनवलं जातं आहे.
जानेवारी 2024 साली हे मंदिर रामभक्तांना दर्शनासाठी खुलं होणार आहे, असं श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत रॉय यांनी सांगितले.