उन्हाळ्यातील फ्रिजची 'इथं' करा आकर्षक खरेदी 

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांचा माठातील थंडगार पाणी पिण्याची इच्छा होत असते. 

 त्यामुळे उन्हाळ्याची चाहूल लागली की गरिबांचा फ्रिज असलेले थंड पाण्याचे माठ बाजारात दाखल होतात. 

 बहुतांश लोक थंड पाण्यासाठी माठालाच प्राधान्य देतात.

 जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात वेगवेगळी डिझाईन्स असलेली आकर्षक माठ विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. 

 यामध्ये विविध आकारसुद्धा आहेत.विविध रंगातील माठ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. 

या ठिकाणी लाल मातीतले माठ, काळ्या रंगाचे माठ, पांढऱ्या रंगाचे माठ, नळ असणारे माठ, मोठे रांजण असे अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे माठ आहेत. 

माठा बरोबरच माठ ठेवण्यासाठीचे स्टँड, माती पासुन बनवलेली पाणी बॉटल, रांजण, भाजी शिजवण्यासाठी चूल असे आणखी प्रकार देखील उपलब्ध आहेत.

या माठांची किंमत 200 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत आहे, असं माठ विक्रते संजय गोडबोले यांनी सांगितले.