वारकरी सांप्रदाय हा जात, धर्म, लिंग भेद विसरून शुद्ध भक्ती मार्ग सांगणारा सांप्रदाय मानला जातो.
या ठिकाणी 'माऊली' याच संबोधनात सर्व सान-थोर एकत्र येत विठू नामाचा गजर करतात.
दरवर्षी आषाढी कार्तिकीला दिंड्या पताका घेऊन लाखो वारकरी पंढरीत दाखल होतात.
अलिकडे उच्चशिक्षित तरुणही वारकरी सांप्रदायाच्या वैचारिक आणि अध्यात्मिक शिदोरीने भारावत आहेत.
या अध्यात्मिक वातावरणाकडे तरुण मंडळीचा ओढा कायम असल्याचं डोंबिवली शहरात दिसून येतंय.
डोंबिवलीतील तरुण मोठ्या प्रमाणात वारकरी सांप्रदायाशी जोडले जात असून भजन, कीर्तनात तल्लीन होत आहेत.
डोंबिवली शहराच्या आजूबाजूच्या 85 गावांमध्ये वारकरी सांप्रदाय विस्तारलेला आहे.
घरात परंपरेने चालत आलेला वारसा जपण्याचे काम आता येथील तरुणाई करत आहे.
जयेश भाग्यवंत यांनी युवकांचं संघटन करून 'सद्गुरुमाऊली अध्यात्मिक सेवा संस्थान' सुरु केले आहे.
भजन, कीर्तन, अभंग या सर्व गोष्टींमुळे आपल्या आयुष्याला एक दिशा मिळते, असे ही तरुण मंडळी सांगतात.
माऊलींच्या पालखीसोबत आयटी दिंडी!
Click Here