पाना-फुलांतून साकारला विठ्ठल!

'विठ्ठल जळी - स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला' अशा तल्लीनतेने वारकरी विठ्ठलमय झालेले असतात. 

'कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी', म्हणणाऱ्या संत सावता माळी यांना विठ्ठलाचं दर्शन शेतात होतं. 

डोंबिवलीतील कला दिग्दर्शक सुमित पाटील यांना विठ्ठल निसर्गातील पानाफुलांत दिसतो. 

आषाढी वारी जवळ आली असतानाच सुमित यांनी विठ्ठलाची निसर्ग वारी करण्याचं ठरवलं. 

सुमित यांनी पाना फुलांपासून विठ्ठलाची प्रतिकृती साकारली असून पांडुरंगाचं हे मनोहरी रूप लोभस दिसत आहे. 

ग्रामीण भागात जावून विविध लोकांच्या भेटी घेत त्यांच्या मनातील विठ्ठलाची प्रतिमा सुमितने जाणून घेतली. 

त्या परिसरातील उगवणाऱ्या रानभाज्या आणि ग्रामस्थांच्या मदतीने त्याने त्याची कला साकारण्याचे ठरवलं. 

कडुलिंब, केळी, पालक, नारळ, सुखा पेंढा अशा विविध निसर्गातील वस्तूंपासून त्याने सुंदर कलाकृती साकारली.

'वृक्षवल्ली आम्हा सोयरी' हा तुकोबांचा अभंग ऐकल्यानंतर निसर्गातील विठ्ठल मी शोधत होतो. 

निसर्ग हाच माझ्यासाठी विठ्ठल आहे आणि विठ्ठल हाच माझ्यासाठी निसर्ग आहे, असं सुमितनं नमूद केलं.

माऊलींच्या पालखीसोबत आयटी  दिंडी!

Click Here