ग्यानबा-तुकारामाच्या जयघोषात आषाढी वारीला आता सुरूवात झाली आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी संपूर्ण पुणे शहर सज्ज झालंय.
पुणे शहरात वारी मुक्कामी असताना सुरक्षा व्यवस्था चोख असणार आहे.
वारकऱ्यांच्या तसंच दोन्ही पालखीच्या सुरक्षेसाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या सुरक्षेसाठी पुणे पोलिसांकडून खास रायडर्स तैनात करण्यात आलेत.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीसाठी 'संजीवनी रायडर्स' आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीसाठी 'वैकुंठ रायडर्स' सातत्याने पालखीसोबत राहणार आहेत.
हे रायडर्स दुसरे तिसरे कोणी नसून पुणे वाहतूक शाखेचे पोलीस आहेत.
वाहतूक पोलिसांसाठी नव्या कोऱ्या आठ गाड्या देण्यात आल्या आहेत.
लोकेशन ट्रॅकिंग, सायरन अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर गाड्यांमधे केला आहे.
पालखी पुणे शहरात प्रवेश करताना पासून ते शहरा बाहेर पडेपर्यंत पोलीस रायडर्स सातत्याने माऊलींच्या पालखीसोबत असणार आहेत.