6 वर्षांची पुणेकर एव्हरेस्ट गर्ल!
नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट हे शिखर जगभरातील गिर्यारोहकांना कायम खुणावत असतं.
सतत बदलणारे हवामान, प्रतिकूल भौगोलिक परिस्थिती, उंचीवर ऑक्सिजनची कमतरता यामुळे कित्येक दिग्गजांना हे शिखर सर करणे जमलेलं नाही.
एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर करणे ही देखील एक मोठी उपलब्धी मानली जाते.
पुण्यातील सहा वर्षांच्या चिमुरडीनं ही किमया केलीय.
भातुकलीशी खेळण्याच्या वयात या मुलीनं थेट एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलाय.
आरिष्का लड्डा असं या सहा वर्षांच्या चिमुरडीचं नाव आहे.
पुण्यातील कोथरुड परिसरात राहणाऱ्या आरिष्कानं तिची आई डिंपल लड्डा यांच्यासोबत एव्हरेस्टचा बेस कॅम्प सर केलाय.
माय-लेकीच्या जोडीनं उणे 17 अंश तापनामध्ये 130 किलोमीटरचं अंतर पूर्ण केलंय.
सहा वर्षांच्या मुलीनं केलेला हा पराक्रम पाहून सर्वच थक्क झाले आहेत.
'इथं' प्रत्येक पदार्थ मिळतो खास
Click Here