'तिरुपती बालाजी' सर्वात श्रीमंत देवस्थान

आंध्र प्रदेशातील तिरुमला पर्वतावर वसलंय श्री व्यंकटेश्वर स्वामींचं मंदिर.

या दैवताच्या संपत्तीत आहेत 10 टन चांदी आणि 1.2 टन वजनी सोन्याचे दागिने.

सुमारे 11 टन सोनं ठेवलं आहे बँकांमध्ये.

बँकेतल्या ठेवींवरील व्याजाच्या रूपात देवस्थानाला मिळतं कोट्यवधी रुपयांचं उत्पन्न.

2009-10 दरम्यान दररोज सुमारे 50 हजार भाविक घ्यायचे दर्शन. आज ही संख्या आहे लाखात. साहजिकच मंदिराच्या उत्पन्नातही झाली आहे विक्रमी वाढ.

कोरोना लॉकडाऊन काळात देवस्थानाला दान स्वरूपात मिळणाऱ्या उत्पन्नात झाली होती मोठी घट.

सध्याची भाविक संख्या लक्षात घेता देवस्थानाला वर्षभरात 1200 ते 1300 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळणं आहे अपेक्षित.

भाविकांनी दान केलेले डोक्यावरचे केस, दर्शनासाठीची तिकिटं, प्रसादाच्या लाडूंची विक्री, भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था आणि भाविकांनी केलेलं दान, अशा विविध मार्गांनी देवस्थानाच्या उत्पन्नात पडते भर.

भाविकांनी केलेल्या दानातून मिळतं सर्वाधिक उत्पन्न, त्याखालोखाल आहे केशदानाचा क्रमांक. त्याशिवाय 6000 एकर वनजमीन आहे देवस्थानाच्या नावावर.