चित्तथरारक कसरतींनी वेधलं जालनाकरांचं लक्ष!

जालना शहरात मागील सात दिवस आनंदी स्वामी यांचा उत्सव सुरू होता. 

आज (29 जून) गुरुवारी या आषाढी एकादशीनिमीत्त उत्सवाची सांगता होणार आहे. 

 तत्पूर्वी विधिवत पूजाअर्चा करून स्वामींची पालखी मिरवणूक मंदिर परिसरातून शहरात निघाली. 

या पालखी मिरवणुकी दरम्यान भक्ती रसाचे विविध रंग जालनाकरांना अनुभवायला मिळाले.

जालना शहराचे आराध्य दैवत तसेच प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेले आनंदी स्वामी मंदिर प्रसिद्ध आहे. 

1700 मध्ये या मंदिराची स्थापना झाल्याचे सांगितलं जातं. 22 जून पासून या मंदिरात सात दिवसांचा उत्सव सुरू होता.

उत्सवा दरम्यान स्वामींची दररोज वेगवेगळी अशी सात रूपे जालनाकरांना अनुभवयास मिळाली.

आज स्वामींच्या उत्सवाची सांगता होणार आहे यामुळे पालखी मिरवणूक शहरात काढण्यात आली.

 यावेळी चित्तथराक कसरती करत जालना शहरातील युवकांनी डोळ्याचे पारणे फेडले. 

 तर दुसरीकडे महिला आणि अबाल वृद्ध देखील या पालखी सोहळ्यात उत्सवाने सहभागी झाले.