महाराष्ट्रातील ऐतिहासिक मंदिरे आणि वास्तू या संस्कृतीच्या भाग आहेत.
उपराजधानी नागपूरपासून 75 किमी अंतरावर अंभोरा हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.
अंभोरा हे पाच नद्यांच्या संगमावर असणारे निसर्गरम्य ठिकाण आहे.
वैनगंगा, कन्हान, आम, मुरझा आणि कोलारी या पाच नद्यांच्या संगमावर अंभोरा आहे.
आंब (अम्भ) म्हणजे पाणी आणि पाण्याने भरलेले जलप्रदेश म्हणजे अंभोरा होय.
या ठिकाणाला भौगोलिक समृद्धीसह अध्यात्मिक दृष्टीने देखील महत्त्व प्राप्त झाले आहे.
वैनगंगा नदीमुळे नागपूर आणि भंडारा या दोन्ही जिल्ह्याची सीमारेषा निर्माण झाली आहे.
या ठिकाणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द 'स्टेट ऑफ आर्ट' पूल उभारण्यात आला आहे.
पर्यटकांसाठी एक विशेष पर्यटनस्थळ म्हणूनही पुलाचा विकास करण्यात येत आहे.
राम-सीता आणि पांडवांनी वनवासातील काही काळ या परिसरात वास्तव्य केल्याचे सांगितले जातं.
बाबासाहेबांच्या जीवनातील अमूल्य ठेवा!
Click Here