दुग्ध व्यवसायातून तरुण बनला लखपती!
जालन्यातील जिल्ह्यातील तरुण 19 व्या वर्षीच दुग्ध व्यवसाय सुरु करून वर्षाला लाखो रुपये कमावत आहे.
कधीकाळी सेनेत जाऊन देशसेवा करण्याचे स्वप्न पाहणारा हा तरुण दुग्ध व्यवसायात कसा उतरला आहे.
जिल्ह्यातील दहिफळ काळे इथला निवासी असलेला तरुण अमर काळे हा सैन्यात जाण्यासाठी प्रयत्नशील होता.
त्यासाठी त्याने छञपती संभाजीनगर इथे अकॅडमी देखील लावली.
मात्र, काहीच दिवसात कोरोना आला आणि लॉकडाऊनमुळे त्याला घरी यावे लागले.
यामुळे घरी शेती थोडी असल्याने रिकाम्या वेळेत काय करावे हा प्रश्न त्याला पडू लागला.
जून 2021 मध्ये त्याच्या वडिलांनी त्याला एक एचएफ गाय घेऊन दिली.
त्यानंर दोनेक महिन्यांनी त्यांनी आणखी दोन गायी खरेदी करून या व्यवसायात पाऊल टाकले.
आता दिवसाला किमान 50 लिटर दूध डेअरीला विक्री होते. त्याला 35 ते 40 रुपयांचा दर मिळतो.
महिन्याकाठी 50 हजार रुपये दूध विक्री मधून मिळतात.