'फॉरेनची पालटलीण' चित्रपटाप्रमाणेच काहीसं अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमध्ये घडलंय.
चीनची कन्या अहमदनगरची सूनबाई झाली असून नुकताच विवाह सोहळा पार पडलाय.
भोजदरी येथील राहुल हांडे योगाचं शिक्षक म्हणून चीनला गेला.
योग शिकवत असतानाच तेथील शान यान छांग या तरुणीसोबत त्याची मैत्री झाली.
पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांनी कायमचं एकत्र येण्याचा निर्णय घेतला.
चीनमध्ये रजिस्टर मॅरेज करुन त्यांनी संगमनेर इथे पारंपरिक पद्धतीनं विवाहाचा निर्णय घेतला.
राहुल आणि शान यान यांनी गावी येत पारंपारिक हिंदू पद्धतीने सर्वांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.
हळदीपासून सर्व विधी पार पडताना शान यान अगदी भारावून गेली होती.
राहुलचा स्वभाव आवडल्यामुळे आम्ही घरच्यांच्या संमतीने विवाहाचा निर्णय घेतल्याचं शान हिनं सांगितलं.
कोरोना काळात शाननं चीनमध्ये राहुलची योग्य पद्धतीने काळजी घेतली, असं राहुलच्या आईनं सांगतिलं.
आता लग्नविधी संपल्यानंतर राहूल पुन्हा चीनला रवाना होणार असून या अनोख्या लव्हस्टोरीची सर्वत्र चर्चा आहे.
पाकिस्तानातील देवी सोलापुरात!
Click Here