महाराष्ट्रातील आदिवासी वस्तीत जन्मलेल्या राहीबाई पोपरे यांचा प्रवास थक्क करणारा आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोंभाळणे या खेड्यातून त्यांनी सीड बँक सुरू केली.
याच क्षेत्रातील कामाबद्दल राहीबाईंना बीजमाता म्हणून ओळख मिळाली.
अनेक जुन्या गावठी पालेभाज्या व वेलवर्गीय भाज्यांचे बियाणे राहीबाईंनी जतन केले आहे.
राहीबाईंच्या सीड बँकेत आज अनेक पिकांचे 250 पेक्षा अधिक वाण आहेत.
सीड बँकमध्ये संवर्धन केलेले बियाणे इतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय सीड कंपनीकडे नाहीत.
राहीबाई यांनी तीन हजार स्त्रिया व शेतकरी सोबत घेऊन बचत गट बनवला आहे.
या बचत गटांच्या माध्यमातून या भाज्या अस्सल गावठी व संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवल्या जातात.
राहीबाईंना त्यांच्या कामगिरीसाठी देशातील चौथा सर्वोच्च पुरस्कार पद्मश्रीनं गौरवण्यात आलंय.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी त्यांचा सीड मदर म्हणजेच बीजमाता असा उल्लेख केला होता.
Click Here