महाराष्टातील तीन क्रमांकाचे सर्वात उंच शिखर म्हणून हरीचंद्रगडाची ओळख आहे.
सह्याद्री पर्वत रांगेतील उंच शिखरे असणाऱ्या प्रदेशातच हे ठिकाण आहे.
शिवमंदिर, तारामती, बालेकिल्ला आणि विस्तीर्ण पठार असा मिळून हरिश्चंद्रगड आहे.
हरिश्चंद्रगडाची समुद्र सपाटीपासून उंची 1424 मीटर एवढी आहे.
निसर्गाने संपन्न असणारा हा प्रदेश अनेकांचे आकर्षण केंद्र असून भटक्यांची पंढरी म्हणून ओळखला जातो.
ऐतिहासिक, नैसर्गिक, अध्यात्मिक आणि मंदिर शिल्पांची आवड असणाऱ्यांसाठी हरिश्चंद्रगड पर्वणी ठरतो.
सध्या या परिसरात मुसळधार पाऊस बरसत असल्याने मोठ्या संख्येने पर्यटक हरिचंद्रगडावर हजेरी लावत आहेत.
पावसाच्या संततधारेमुळे गडावर धुक्याची चादर पसरली आहे.
हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर, केदारेश्वराची गुहा, तारामती शिखर येथे पर्यटक आणि भाविक आवर्जून भेट देतात.
कोकणकडा पुष्करणी कुंड, सात गुहा आदी पर्यटनाची आकर्षण केंद्रं या ठिकाणी आहेत.
कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती
Click Here