सह्याद्रीतील मिलेट मॅन!

यंदाचे वर्ष हे जगभरात आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले जातेय. 

महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी तृणधान्यांच्या संवर्धनाचे काम होतेय. 

जहागीरदार वाडीतील बाळू घोडे हे काम करीत असून मिलेट मॅन अशीच त्यांची ओळख आहे. 

विशेष म्हणजे घोडे हे परिसारतील शेतकऱ्यांनाही भरड संवर्धन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहेत.

अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वत रांगेत जहागीरदारवाडी सारख्या छोट्या गावात बाळू घोडे राहातात. 

सन 2010 नंतर शेती आणि कामासाठी जंगलात फिरता फिरता जंगली वनस्पतींचा अभ्यास सुरू केला. 

सध्या त्यांच्याकडे 60 ते 70 रानभाज्यांची माहिती उपलब्ध असून आपल्या शेतात ते त्या पिकवतात. 

10 वर्षांपासून त्यांची मिलेट्स बँक सुरु असून यात नाचणी, वरई, भादली, सावा, राळा वाणांचा समावेश आहे.

तृणधान्यांच्या संवर्धनासाठी विविध कार्यक्रम आणि कृषी प्रदर्शनात बाळू घोडे सहभागी होतात. 

बाळू यांनी एक मिलेट कलश तयार केला असून हा विविध प्रदर्शनात तो सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. 

दिव्यांगांसाठी बनवली सौर सायकल!

Click Here