मंगळवार बाजार; जे कुठं नाही, ते इथं मिळेल!

साध्या सुईपासून कोणतीही वस्तू हमखास मिळण्याचे ठिकाण म्हणजे अहमदनगरचा मंगळवार बाजार होय. 

नगरमध्ये तब्बल 90 वर्षांपासून मंगळवार बाजार भरतो, असं सांगितलं जातं. 

कष्टकऱ्यांना आणि हातावर रोजीरोटी असलेल्यांना आधार देणारा बाजार म्हणून मंगळवार बाजारची ओळख आहे. 

अहमदनगरमध्ये भरणाऱ्या मंगळवार बाजाराला पूर्वी बेग पटांगणावर जागा होती. 

पुढे हा बाजार सर्जेपुरा-मंगल गेट परिसरात स्थलांतरीत झाला. पण येथे भाजी ओटे वा अन्य सुविधा नाहीत. 

रहदारीच्या रस्त्य़ांवरच हा बाजार भरत असून केवळ दुचाकी वाहनांची रहदारी सुरू असते. 

मंगळवार बाजाराचे रूप आता काळानुसार बदलत असून अनेक नवीन वस्तू येथे मिळत आहेत. 

भाजीपाला, किराणा, कपडे, जुन्या वाहनांचे स्पेअरपार्ट, जुनी वाहने, टायर-ट्युब, लोखंडी औजारे येथे मिळतात.

चपला-बूट, धान्य, मिठाई-फरसाण, शेती औजारे, रद्दी, शोभेच्या वस्तू आणि मोबाईल दुरुस्तीची दुकानेही येथे आहेत.

विशेष म्हणजे हा बाजार म्हणजे मुंबईतील कथित चोरबाजारासारखा नाही. 

कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

Click Here