ठिबक सिंचनासाठी तरुणाचा भन्नाट जुगाड!

शेतीच्या यांत्रिकीकरणात शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती हा मोठा अडथळा आहे. 

तरीही शेतकरी आपल्या शेतात गरजेनुसार वेगवेगळे जुगाड करत असतो. 

लातूरमधील सुरेश कोतापुरे यांनी झाडांना पाणी देण्यासाठी असेच एक भन्नाट जुगाड केले आहे. 

कोतापुरे यांनी चक्क माठापासून ठिबक सिंचन तयार केले आहे. 

कोतापुरे यांचा मित्र बांधावर लावलेल्या झाडांना खांद्यावरून आणून पाणी घालत होता.

16 रोपांना 16 घागरी याप्रमाणे जवळपास 300 ते 325 लिटर पाणी दररोज लागत होते. 

कुंभार व्यवसाय करणाऱ्या सुरेश यांनी मित्राची समस्या सोडवण्यासाठी देशी जुगाड केले.

माठालाच ड्रिपचे साहित्य बसवून त्यांनी ठिबक सिंचन तयार केले.

कोतापुरे यांची ही नामी शक्कल उपयुक्त ठरली असून 4 घागरीत 16 रोपट्यांना पाणी पुरवले जात आहे. 

सुरेश यांनी माठापासून तयार केलेल्या ड्रीपला शेतकऱ्यांची मागणी असून आतापर्यंत 15 शेतकऱ्यांनी शेतात वापर केला आहे.

सांगलीच्या पैलवानाची थंडाई पोहोचली दुबईत!

Click Here