कमी पाण्यात अधिक नफा देणारी मोसंबीची शेती

मराठवाड्यातील बहुतांश शेतकरी सध्या मोसंबी आणि इतर फळबागांची शेती करत आहेत. 

योग्य नियोजन आणि वातावरणात होणारा बदल यामुळे अनेक शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. 

मोसंबी फळबागेची शेती करताना लागवडीपासून ते काढणीपर्यंत योग्य काळजी घेण्याची गरज असते. 

मोसंबीची लागवड करण्याच्या अनेक पद्धती असून 20×20 अंतरावर लागवड करणे योग्य आहे. 

झाडाला जास्त कालावधीसाठी उत्पादनशील ठेवायचं असेल तर 20×20 अंतरावरच लागवड करणे योग्य आहे. 

मोसंबीच्या झाडाच्या जातीची निवड करताना सालगुडी, न्युसेलर याच जातींची निवड करावी.

मोसंबी कलमे प्रत्यक्ष लावलेल्या जागेवर घ्यावीत आणि ती सरळ जोमदार वाढलेली आणि ताजी असावी. 

मोसंबीच्या रोपांची कलमे सरकारी किंवा नोंदणीकृत रोप वाटिकेतूनच खरेदी करावीत.

मोसंबीला पावसाळ्यात 13, हिवाळ्यात 11 ते 14 आणि उन्हाळ्यात 6 ते 11 दिवसाच्या फरकाने पाणी द्यावे. 

ठिबक पद्धतीने मोसंबीच्या झाडांना पाणी व खते दिल्यास मोसंबीची शेती अधिक फायदेशीर ठरते. 

अन्वीनं दुसऱ्यांदा केली मोहीम फत्ते!

Click Here