गारपीटीनं शेतकऱ्यांचं नुकसान!

आणखी पाहा...!

सध्या राज्यभर अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. 

 बीडमध्येही अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जोरदार गारपीट झाली. 

गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

बीड, गेवराई, वडवणी या तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. 

बीड शहरात देखील तुफान गारा पडल्या. 

या पावसाने गहू, ज्वारीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

मोसंबी, संत्रा, आंब्यांच्या बागांचेही मोठे नुकसान झाले आहे.

अवकाळीने पिके आडवी झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.