खाऊनच दाखवा 'हा' पराठा
अरेच्चा, पराठा खाल्ल्यावर
1 लाख मिळतील?
तुम्ही कितीही मोठे खवय्ये असलात, तरी जरा थांबा. हा काही साधा पराठा नाहीये.
मुळात खायला असेल वेळेचं बंधन. वेळ असेल
फक्त 15 मिनिटं.
खूप आले आणि गेले, 4 वर्षांत एकालाही हा पराठा खायला जमलं नाही.
हरियाणाच्या मुरथल भागातील रॉयल गावात मिळतो हा रॉयल पराठा.
पराठा खाणाऱ्याला ढाबा मालक देणार आहे तब्बल 1 लाखाचं बक्षीस आणि मोफत जेवण.
हा एक पराठा बनवण्यासाठी होतो 2 किलो पिठाचा आणि 600 ते 700 ग्रॅम कांदा, बटाट्याचा वापर.
दररोज शुद्ध तुपात बनवल्या जाणाऱ्या या पराठ्यानेच होते ढाब्याची सुरुवात.
पराठा बघूनच भरतं खाणाऱ्यांचं पोट, तरी मालकाला आहे विजेत्याचा शोध.