पुन्हा ज्योती मौर्य? शिक्षिका होताच फरार
उत्तर प्रदेशच्या 'ज्योती मौर्य' प्रकरणासारखंच काहीसं एक प्रकरण बिहारच्या वैशाली जिल्ह्यातून आलंय समोर.
नवऱ्याच्या पैशांनी बायको शिकली आणि पळून गेली.
शिक्षिका होताच महिलेची मुख्याध्यापकांशी वाढली जवळीक.
नोकरी मिळताच दीड वर्षांनी महिला मुख्याध्यापकांसोबत झाली फरार.
13 वर्षांपूर्वी पार पडला होता चंदन-सरिताचा प्रेमविवाह.
महीपुराचा निवासी चंदन याची बहिणीच्या लग्नात झाली होती सरिताशी पहिली नजरानजर.
ओळख झाली. दिवस लोटले तसं मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. मग निर्णय घेतला लग्नाचा.
दहावी पास सरिताला घ्यायचं होतं पुढचं शिक्षण.
सरिताचं स्वप्न स्वतःचं मानून चंदन करू लागला दिवस-रात्र मेहनत. त्याने तिला जिद्दीने शिकवलं...आणि होत्याचं नव्हतं झालं.