चक्क एका तिळावर रेखाटले शिवराय!

आणखी पाहा...!

यवतमाळमधील अभिषेक रुद्रवार हा सूक्ष्म कलाकृती तयार करतो. 

अभिषेकने एका तिळाचे 100 तुकडे केले आहेत. 

अभिषेकच्या या पराक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. 

पुसद येथील अभिषेकने हजारहून अधिक कलाकृती तयार केल्या आहेत.

गेल्या चार वर्षांपासून अभिषेक ही कला जोपासत आहे. 

एका तिळाच्या दाण्यावर त्याने छत्रपती शिवाजी महाराज रेखाटले आहेत. 

पेन्सिलच्या टोकावर शिवाजी महाराज, तुळजाभवानी यांची मूर्ती कोरली आहे. 

सुपारीवर भवानी देवी, रेणुका देवी, शिवलिंग रेखाटले आहे. 

खडूच्या, पेन्सिलच्या टोकावर गणपती तसेच इतर मूर्ती कोरल्या आहेत. 

ही कला खर्चिक नसली तरी मनाची आणि एकाग्रतेचा सचोटी बघणारी आहे. 

अभिषेकच्या मायक्रो आर्टवर्कचे सर्वत्र कौतुक होत आहे.