वर्ध्यात बहरली 'ड्रॅगन फ्रुट'ची शेती!

वर्धा जिल्ह्णातील सेलूच्या युवकाने सेंद्रीय पद्धतीने चक्क विदेशी 'ड्रॅगन फ्रुट' ची लागवड केली.

प्रारंभी त्याला काहींनी वेड्यात काढले. 

पण वर्षभरानंतरच उत्पादन सुरु झाल्याने या युवकाच्या जिद्दीपुढे टिकाकारांना तोंडावर हात ठेवण्याची वेळ आली.

शुभम राजेश्वर दांडेकर असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. 

त्याच्याकडे पवनार शिवारात दोन एकर शेती आहे.

येथे त्याने 'ड्रॅगन फ्रुट' या विदेशी फळझाडांची लागवड केली. 

अमेरिका व व्हिएतनाम या देशातून त्याने 2 हजार 800 रोपे मागविली. 

अडीच लाख रुपये खर्चून आणलेल्या या रोपट्यांची दीड एकरामध्ये 12 बाय 7 अशा अंतरावर लागवड केली.

वर्षभरात फळधारणा होऊन उत्पन्नही सुरु झाले आहे.

सध्या फळाला मोठी मागणी असून नागपूर व वर्धा येथील बाजारपेठेत शेतातूनच विक्री होत आहे.

 100 रुपयामध्ये फळविक्री सुरु आहे, अशी माहिती शुभम दांडेकर यांनी दिली.