डान्स करत 'हॉट डॉग' विकणारा मुंबईकर तरुण

 मुंबईतील एका तरुणाने हॉट डॉग या विदेशी पदार्थाच्या विक्रीचा स्टार्टअप सुरू केला आहे. 

त्याच्या खास शैलीमुळे हे रेस्टॉरंट सध्या चांगलंच लोकप्रिय झालं आहे.

मुंबईतील मालाड परिसरात राहणाऱ्या अभिषेक वादवा या तरुणाने हॉट डॉगचे स्टार्टअप सुरू केले आहे. 

अभिषेक हा डान्सर आहे. तो त्याच्या दुकाना डान्स करत ग्राहकांना हा पदार्थ देतो. 

त्याची ही पद्धत अनेकांना आवडत असून, मुंबईकर सध्या अभिषेकच्या या स्टार्टअपकडे आकर्षित होत आहेत. 

फक्त डान्स करून काही भागत नसल्याने सोबत आणखी काहीतरी केलं पाहिजे असं अभिषेकच्या मनात आलं. 

त्यामुळे त्याने मुंबईच्या रस्त्यांवर हॉट डॉग विकण्याचा निर्णय घेतला. 

त्याच्या या स्टार्टअपची सध्या मुंबईत चर्चा आहे.

 गोल भाजलेला पाव ज्यामध्ये काही सॉस, मसाले, कांदा व सॉसेजेस भरून हा हॉट डॉग तयार केला जातो. 

दुकान क्रमांक 29, गुरु कृपा हाऊसिंग सोसायटी, अपोलो फार्मसी समोर हा हॉट डॉग पदार्थ खायला मिळेल.