नुकतेच इचलकरंजी येथे कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार झाला.
लातूरचा सोनबा दत्तात्रय लवटे पहिला कुमार महाराष्ट्र केसरी ठरला आहे.
सोनबानं 110 किलो वजन गटात 'कुमार महाराष्ट्र केसरी' किताब पटकावला.
अंतिम सामन्यात सोनबाने पै. आर्यन पाटील याला 8-1 गुण फरकाने पराभूत केले.
या विजेतेपदानंतर त्याला मानाची चांदीची गदा देण्यात आली.
सोनबा हा लातूर जिल्ह्यातील हासेगाववाडी येथील रहिवाशी आहे.
वडील अल्पभूधारक शेतकरी असून आई घरकामासोबत शेतीमध्ये मदत करते.
वडील दत्तात्रय लवटे यांचीही उत्तम पैलवान अशी पंचक्रोशित ओळख आहे.
सोनबाने वडिलांकडूनच कुस्तीचे धडे घेतले.
कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीचाही यशात मोठा वाटा आहे.
सोनबा गेल्या चार वर्षांपासून गंगावेस तालमीत कुस्तीचा सराव करत आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सोनबा लवटेचा सत्कार केला.
कुमार महाराष्ट्र केसरी सोनबा लवटेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कुमार महाराष्ट्र केसरी सोनबा लवटे याचं सर्वत्र कौतुक होत आहे.