देशातील शाळांमध्ये भौतिक सुविधा वाढत आहेत.
जिल्हा परिषद शाळांचीही प्रयोगशिलता,नवोपक्रम यासाठी नेहमीच चर्चा असते.
पुणे जिल्ह्यात अशीच एक उपक्रमशिल शाळा आहे.
वाबळेवाडीची जि. प. शाळा देशातील पहिली झिरो एनर्जी स्कूल ठरली आहे.
मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी शाळेचा कायापालट केला आहे.
जिल्हा परिषदेची शाळा इंटरनॅशनल स्कूलपेक्षाही भारी दिसत आहे.
ग्रामस्थांच्या सहकार्यातून शाळेत 430 किलो वॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारला.
सौर ऊर्जेद्वारे वीज वापरणारी पुणे जिल्ह्यातील ही पहिली शाळा आहे.
शाळेची गरज भागवून गावातील पथदिव्यांसाठी देखील वीज दिली जाते.
शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मागील चार वर्षांपासून टॅब वर शिक्षण दिले जाते.
शाळेच्या परिसरात 73 प्रकारची झाडे देखील लावण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना संगीत, कला, क्रीडा आदी शिक्षण दिले जाते.
आनंदी शिक्षणासाठी प्रात्यक्षिकांवर भर दिला जातो.
शाळेच्या विकासात शिक्षक, विद्यार्थी आणि गावकऱ्यांचेही मोठे योगदान आहे.
वाबळेवाडीची शाळा पाहण्यासाठी अनेकजण भेट देत असतात.