कुलरचा शॉक लागू नये म्हणून काय कराल? 

कूलर सुरू असताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे. करंट आल्याचे लक्षात येताच तो आधी बंद करावा.

पाणी भरताना स्वीच बंद करावा. तसेच प्लग पिन काढून ठेवायला हवी. 

कूलर लावण्याआधी घरातील अर्थिंग सक्षम आहे का, हे त्या विषयातील तज्ञाकडून तपासून घ्यावे. 

जोड असलेल्या वायरने कूलरला पाणीपुरवठा करू नये. त्यासाठी अखंड वायर ठेवावी. 

आयएसआय मार्क नसलेले कूलर विकत घेऊ नये. त्यामुळे विजेचा शॉक लागण्याची शक्यता आहे.

फेज वायर स्वीच म्हणून टाकल्याने स्वीच ऑफ केला तर लाईव्ह वायरचा परिणाम कूरलच्या बॉडीत येतो.

कूलरमध्ये पाणी असल्याने इलेक्ट्रिकल सर्किट होऊन कूलरच्या लोखंडी बॉडीत करंट येतो. यावेळी शरीराला स्पर्श झाला की लगेच शॉक बसतो. 

कूलरच्या सानिध्यात कुणाला विजेचा धक्का लागला तर त्या व्यक्तीला कोरड्या लाकडी रॉडने कूलरपासून वेगळे करावे.

तसेच त्वरीत वैद्यकीय उपचाराकरिता डॉक्टरकडे पाठवावे, असेही तज्ञ सांगता.