नाशिकमधील हटके चहाची टपरी
नाशिकच्या संकेत क्षीरसागरने औरंगाबाद रोड परिसरात अनोखी चाय टपरी सुरू केली आहे.
चारचाकी वाहनावर चहाच्या कपाची प्रतिकृती साकारत त्यानं ही चाय टपरी बनवलीय. ही चाय टपरी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे.
उच्चशिक्षित तरुणाने नोकरी नाही लागली म्हणून हतबल न होता नाशिकच्या औरंगाबाद रोड परिसरात अनोखी चाय टपरी सुरू केली आहे.
ही चाय टपरी प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत आहे. दूरवरून दिसनारा हा चहाचा कप सर्वांना आकर्षित करतो.
चहाची क्वालिटी ही भन्नाट असल्यामुळे अनेक जण चहाचा अस्वाद घेतात, अशी माहिती संकेतनं दिली.