विद्यार्थ्यांनीच सोडवला पाण्याचा प्रश्न

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पाण्याची समस्या जाणवते. 

वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाण्याची समस्या आहे.

इंद्रप्रस्थ न्यु आर्ट्स कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे मोर्चापूर येथे ग्रामीण शिबीर होते. 

विद्यार्थ्यांनी मोर्चापूर गावातील विविध समस्या जाणून घेतल्या. 

मोर्चापुरात पाण्याची गंभीर समस्या आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी पाणी प्रश्न सोडवण्यासाठी बंधारा बांधला.

गावकऱ्यांनीही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मदत केली.

श्रमदानातून बांधलेल्या बंधाऱ्यामुळे उन्हाळ्यात जनावरांसाठी पाणी उपलब्ध होणार आहे.

बंधाऱ्यात पाणी आडून राहिल्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यासही मदत होणार आहे.

भूजल पातळी वाढविण्यासठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' हाच चांगला उपाय आहे.