दोघे गुपचूप भेटायचे, गावकऱ्यांनी पाहिलं आणि...

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि पुढे जाऊन ते पळून जाऊन लग्न करतात, असं आपण नेहमी पाहिलंय.

पण बिहारमधील गोपालगंज इथं एक वेगळचं प्रकरण समोर आलं

इथं 3 वर्षांपासून ऐकमेकांना भेटणाऱ्या प्रियकर आणि प्रेयसीचं गावकऱ्यांनी मंदिरात लग्न लावून दिलं

ही घटना गोपालगंज येथील बरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली.

रिमझिम कुमारी असं या तरुणीचं नाव आहे तर भीम कुमार असं तरुणाचं नाव आहे. दोघेही वेगवेगळ्या गावात राहणारे होते.

अखेर गावकऱ्यांनी त्यांना पकडलं आणि  सरपंच हरिदर सिंह यांनी पंचायत बोलावली.

अखेर दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्यानंतर पंचायतीने लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला.

पंचायतीच्या निर्णयानंतर सोमवारी दोघेही प्रेमीयुगुल गाव सोडून बाहेर पडले.

गेल्या 3 वर्षांपासून त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

केदारनाथ मंदिरात प्रपोज केल्यामुळे संताप