आपण 'सैराट'मधील ट्रॅक्टर चालवणारी आर्ची पाहिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यात वंदना शेळके ही रिअल आर्ची आहे.
संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी हे वंदना हिचे गाव आहे.
शेतकरी लिंबाजी शेळके यांना वंदना व ऋतुजा या दोन मुली आहेत.
लहानपणापासूनच आई-वडिलांना शेतीच्या कामात मदत करत.
दोघी बहिणी मिळून वडिलांची 20 एकर शेती करतात.
बी. फार्मसी करणारी वंदना स्वत: ट्रॅक्टर चालवते.
वंदना ट्रॅक्टरने नांगरणी, वखारणी, फवारणी ही सर्व कामे करते.
शेतीपुरक व्यवसाय म्हणून वंदनाच्या घरी गोपालनही केले जाते.
गोठ्यातील जनावरांना चारा, पाणी, दूध काढणे अशी सर्व कामे मुली करतात.
मुलगा मुलगी भेद नाही, दोन्ही मुलींचा अभिमान आहे, असे वडील म्हणतात.