7 नाही इथं 8 फेरे घेऊन पार पडतं लग्न!

लग्नात साधारणतः 7 फेरे घेतले जातात...पण राजस्थानमध्ये वधू-वर चक्क 8 फेरे घेतात. 

राजस्थानच्या एका समाजाबाबत थक्क करणाऱ्या अनोख्या परंपरा आहेत. 

लग्नात घेतल्या जाणाऱ्या प्रत्येक फेऱ्याला एक सांस्कृतिक अर्थ असतो. श्रीमाली समाजातील लोक लग्नात आठवाही फेरा घेतात.

विशेष म्हणजे हा फेरा वधू-वर एकमेकांचा हात हातात घेऊन नाही, तर वर वधूला उचलून घेऊन पूर्ण करतो. 

वर्षानुवर्षे श्रीमाली समाजातील लोकांनी ही प्रथा अगदी प्रेमाने जपली आहे. 

श्रीकृष्णाचं लग्न ज्यापद्धतीने  पार पडलं, त्याच पद्धती पाळणे या समाजातील लोक पसंत करतात. 

कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहसोहळ्यात रुक्मिणी मातेच्या पायाला दुखापत झाली होती. 

कृष्ण आणि रुक्मिणी यांच्या विवाहसोहळ्यात रुक्मिणी मातेच्या पायाला दुखापत झाली होती. 

कृष्णाने रुक्मिणी मातेला उचललं आणि सप्तपदी पूर्ण केल्या. त्यामुळे या समाजात लग्नगाठ बांधताना आठवा फेरा अशा पद्धतीने घेतला जातो.

वटवृक्षांच्या पुर्नलागवडीचा जालना पॅटर्न!