2 वर्षाच्या चिमुकल्यानं पटकावले 3 जागतिक पुरस्कार
विरार मधील 2 वर्षाच्या चिमुकल्याने जागतिक कीर्तीचे 3 पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत.
हृद्य प्रतीक नाईक असे या बालकाचे नाव असून तो नाळा येथे राहतो.
हृद्यने इंटरनॅशनल बुक रेकॉर्ड, कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया स्पर्धेत सहभागी होत जागतिक कीर्तीचे 3 पुरस्कार आपल्या नावे केले आहेत, अशी माहिती हृद्यची आई अंकिता नाईक यांनी दिली आहे.
हृद्य 7 महिन्यांचा असताना त्याने इंटरनॅशनल बुक रेकॉर्डमध्ये आपली नोंद केली.या स्पर्धेत 200 हून अधिक फ्लॅश कार्डची ( चित्रावरून वस्तू ओळखणे) अचूक माहिती दिली. यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला.
9 महिन्यांचा असताना त्याने कलाम्स वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 300 हून अधिक फ्लॅश कार्ड आणि प्राणी, फुले, शरीराचा भाग, रंग, आकार, याची अचूक माहिती दिली.
यानंतर 13 महिन्यांचा होताच त्याने वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया स्पर्धेत भाग घेऊन 400 च्या जवळपास प्लॅश कार्ड आणि 45 पेक्षा अधिक देशाचे ध्वज ओळखून दाखविले.