बीडमध्ये बनतो गुजराती फेमस फाफडा

स्ट्रीट फूडच्या बाबतीत बीड देखील आता मागे राहिले नाही.

बीडमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. 

मूळची गुजराती डिश असलेला फाफडा देशभर प्रसिद्ध आहे.

फाफड्याची चव बीडमध्ये देखील चाखायला मिळत असल्याने खवय्ये आवडीने आस्वाद घेत आहेत.

बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये किशोर शर्मा यांनी 1990 च्या सुमारास एका छोट्याशा दुकानांमध्ये स्वीट मार्टचा व्यवसाय सुरू केला.

त्यावेळी 5 रुपये प्लेट पासून शर्मा यांनी फाफड्याची विक्री सुरू केली. आता फाफडाच्या प्लेटची किंमत 20 रुपये इतकी झाली आहे.

बेसन पीठ, ओवा, बेकिंग सोडा आणि मीठ यापासून फाफड्याच्या पिठाचे मिश्रण तयार केले जाते. हे पीठ मळण्याची एक वेगळी कला आहे.