सोलापूर विद्यापीठात दिसली भारतीय संस्कृती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 

या शोभायात्रेत एकूण 13 विद्यापीठांनी सहभाग नोंदविला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संघाने एकसंघ भारताच्या संकल्पचा संदेश दिला.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या संघाने भारतीय संस्कृतीवर शोभायात्रेत सादरीकरण केले.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या संघाने आदिवासी बांधवांचा शोभायात्रेत सन्मान केल्याचे दिसून आले.

कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या संघाने भारतीय संस्कृतीचा जागर केला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संघाने अवयव दान श्रेष्ठ दान असल्याचे सांगितले तसेच त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचाही जागर केला.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या संघाने माता अंबाबाईचा जागर केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापिठाने देशातील न्याय प्रणाली आणी महाराष्ट्रातील लोककला सादर केली होती .