दुष्काळी तालुक्यात चक्क सफरचंदाची बाग!
सांगली जिल्ह्यातील जत तालुका दुष्काळी म्हणून ओळखला जातो.
पाण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला होता.
आता याच दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्याने केलेल्या प्रयोगाची सर्वत्र चर्चा आहे.
काश्मीरमधील सफरचंद जतमध्ये पिकवले आहे.
अंतराळ येथील काकासाहेब सावंत हे प्रयोगशील शेतकरी आहेत.
हिमाचल प्रदेशात जावून सफरचंदाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चा केली.
हिमाचल प्रदेशातून 'हरमन 99' या वाणाची 150 रोपे आणली.
शेणखत, खतांचे डोस आणि ठिबकच्या माध्यमातून रोपांना पाणी दिले.
योग्य काळजी घेतल्यानंतर यातील 125 रोपे जगली.
दोन वर्षांनी प्रत्येक झाडाला 30 ते 40 सफरचंद लागली.
बागेतून 75 हजार ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
हिमाचल प्रदेशातील सफरचंद आणि जतमधील सफरचंद सारखीच आहेत.
दुष्काळी जतमध्ये सफरचंद पिकवल्याने सावंत यांचे कौतुक होत आहे.