आठवड्यातील एक दिवस गरजूंची सेवा करणारा मुंबईकर, अनेकांचा आहे आधार

मुंबईतील टिटवाळा येथे राहत असलेले 38 वर्षीय रवींद्र बिरारी हे आठवड्यातून एक दिवस नाकारलेल्या घटकांसाठी देतात

केस व दाढी करण्याचे साहित्य घेऊन टिटवाळा ते भांडुप या प्रवासात विविध स्थानकांवर असणारे मनोरुग्ण, भिकारी व्यक्ती शोधून त्यांचे केस कापतात.

आत्तापर्यंत त्यांनी अशा प्रकारे 800 जणांचे केस मोफत कापले आणि दाढी केली आहे. बिरारी यांचे भांडुप येथे स्वतःचे सलून आहे.

आपल्याला वाटेल हे काम खूप सोपे असेल पण प्रत्यक्षात तसे नसून हा प्रवास त्यांच्यासाठी खूप खडतर होता.

त्यात त्यांना सुरुवातीला या दारिद्र्य अवस्थेत असलेल्या भिकाऱ्यांनी त्यांना हटकवले तर काहींचा त्यांना मारही खावा लागला.

मात्र, रवींद्र यांनी धीर सोडला नाही आणि आपले काम सुरूच ठेवले. नंतर आपल्या बोलण्यातून कृतीतून त्यांनी या गरीब लोकांशी संवाद साधला.

आणि त्यांचे केस कापण्याचे काम थोडे सोपे होत गेले, असं रवींद्र बिरारी यांनी सांगितलं.