तरूण खेळाडूच्या करिअरला Jellyfish चा दंश, 7 वेळा करावं लागलं ऑपरेशन

पुण्यातील तरुण जलतरणपटूच्या स्वप्नांना एका माशानं दंश केलाय. गीता मालुसरे असं या जलतरणपटूचं नावं आहे. 

काही दिवसांपूर्वी झालेल्या एका स्पर्धेच्या दरम्यान गीताच्या हाताला जेलिफिश माशानं दंश केला. या चाव्यामुळे तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तिच्या करिअरला ब्रेक लागला आहे. 

नेमकं काय घडलं?
कर्वे नगर परिसरात राहणारे महेश मालुसरे यांचे गीता ही मुलगी आहे. 

सर्वसामान्य घरातील गीता तिला आई वडिलांच्या पाठिंब्यामुळे लहानपणापासून स्विमिंग करण्याची आवड निर्माण झाली. यामध्ये तिनं अनेक पुरस्कारही पटकावले आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या एका स्पर्धेच्या दरम्यान तिच्या हाताला जेलिफिश माशानं दोन वेळा दंश केला. गीतानं त्यानंतरही जिद्दीनं ही स्पर्धा पूर्ण करत दुसरा क्रमांक पटकावला.

पण, तिच्या करिअरला यामुळे ब्रेक झालाय. माशानं दंश केलेल्या तिच्या हातावर एक, दोन वेळा नाही तर तब्बल 7 वेळा ऑपरेशन झालं आहे.

डिसेंबर महिन्यात इस्त्राईलला होणाऱ्या स्पर्धेत गीताला भाग घ्यायचा होता. सरावासाठी गीताने नोव्हेंबर महिन्यात रत्नागिरीतल्या स्विमींग स्पर्धेत भागही घेतला.

गीता या स्पर्धेत दुसरी आली. पण पोहताना पाण्यामध्ये जेलीफिशने तिच्या हाताचा चावा घेतला. आणि या चाव्याचा परिणाम असा झाला की गीताचा हातच निकामी झाला होता. 

 सात शस्त्रक्रिया होऊन तिचा हात सुरक्षित आहे. आणखी थोडे दिवस तिला पोहण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.