सप्तशृंगी गडावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त पूजा!

साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवी मंदिरात शाकंभरी नवरात्रोत्सव सुरू आहे. 

सप्तशृंगी गडावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त सहस्रचंडी महायाग पूजा पार पडली. 

यावेळी सप्तशृंगी देवी भक्तांच्या हस्ते होम हवन पूजन करण्यात आले. 

पौर्णिमेनिमित्त भाविकांच्या जयघोषाने सप्तशृंगी मंदिर परिसर दुमदुमला आहे. 

भाविक मोठ्या संख्येने सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जात आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे.