पुणे शहरातही चहाचे अनेक दुकानं प्रसिद्ध आहेत.
अमृततुल्यसाठी प्रसिद्ध असलेल्या पुण्यात आता चक्क गुलाबी रंगाचा चहा मिळतोय.
पुण्यातील नवी पेठ येथे विठ्ठल मंदिराजवळ दर्जेदार नावाचे एक छोटेसे रेस्टॉरंट आहे.
या रेस्टॉरंटमध्ये गुलाबी चहा मिळतो.
अनिकेत वरकडे आणि त्याच्या मित्राने हे रेस्टॉरंट सुरू केले.
या चहामध्ये घट्ट दूध, ड्रायफूड, काश्मिरी कावा असतो.
तसंच अनिकेत आणि त्याच्या कुकनं बनवलेले वेगवेगळे मसालेही वापरले जातात.
या चहामध्ये संपूर्ण नैसर्गिक गोष्टी वापरल्या असून त्यामुळे पित्त होत नाही, असा दावा अनिकेतनं केला आहे.
या चहाची किंमत 35 रुपये आहे.