तब्बल 1 कोटींचा गजेंद्र रेडा!
सोलापूर शहरातील होम मैदान या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनात बेळगाव येथून आलेल्या तब्बल दीड टन वजनाच्या आणि 1 कोटी किंमतीच्या गजेंद्र नावाच्या रेड्याने लक्ष वेधून घेतले.
सोलापूर शहरातील सर्व नागरिकांनी, बालकांनी आणि युवकांनी याला पाहण्यासाठी तुडुंब अशी गर्दी केली होती.
कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील मंगसुळीच्या विलास गणपती नाईक या हौशी पशुपालकाने हा रेडा पाळला आहे.
पाच वर्षांपूर्वी विलास नाईक यांनी चक्क हरियाणात जाऊन एक मुरा जातीची म्हैस 1 लाख 40 हजार रुपयांना खास पालनासाठी गावी आणली, तिच्यापासून या गजेंद्र रेड्याचा जन्म झाला.
त्याला आतापर्यंत 1 कोटीची मागणी आली आहे. परंतु यापेक्षा अधिक किंमत ज्या ठिकाणी येईल त्याच ठिकाणी गजेंद्रला विकणार असल्याचे गजेंद्रचे मालक विलास नाईक यांनी सांगितले.
असा आहे गजेंद्रचा खुराक
गजेंद्रला 15 लिटर दूध, दररोज दोन किलो सफरचंद, गहू, पेंड, आटा, ऊस असे सर्व पदार्थ दररोज त्याला खायला दिले जातात.
गजेंद्रच्या खुराकचा दररोज 2 हजार रुपये इतका खर्च आहे, असं विलास नाईक यांनी सांगितले.