यावर्षी 15 जानेवारी रोजी मकर संक्रात आहे. संक्रातीच्या निमित्तानं घरोघरी हळदी-कूंकूचे कार्यक्रम होतात.
यामध्ये महिलांकडून एकमेकींना वाण दिले जाते.
लग्नानंतरची पाच वर्षे वेगवेगळ्या कुंकवाच्या डब्या, कंगवा, आरसे, बांगड्या, काळे मणीसर या प्रकारच्या वेगवेगळ्या सौभाग्यदानाच्या वस्तू देण्याची पद्धत आहे.
मुंबईतील दादरच्या मार्केटमध्ये संक्रांतीच्या निमित्तानं अनेक वस्तू दाखल झाल्या आहेत.
लक्ष्मीची पाऊल, हळदी कुंकूचे करंडे, शुभ लाभचे वॉलपीस, आंब्याच्या पानांची कागदी तोरणं, कापडी फुलांचे गजरे, नथ, दागिने, हलव्याचे दागिने या विविध वस्तू बाजारात उपलब्ध आहेत.
वाणाच्या वस्तूंच्या किमती काय?एक दादर मार्केटमध्ये 25 रुपयांपासून 250 रुपयांपर्यंत या वाणाच्या वस्तू उपलब्ध आहेत.
तुम्हाला हव्या त्या बजेटनुसार तुम्ही त्या खरेदी करू शकतात. आम्ही वाणाला देण्याच्या वस्तू स्वतः बनवतो. या वस्तू खुप आकर्षक आणि सुंदर असतात.
महिलांच्या बजेटमध्ये असतात. तसेच यावर्षी आम्ही निरनिराळ्या वस्तू तयार केल्या आहेत
महिलांचा प्रतिसाद खुप चांगला आहे. असं महिला वस्तू भांडारच्या कर्मचारी संध्या होसमणी यांनी सांगितलं.