औरंगाबादची 25 वर्षांपासूनची बेस्ट पावभाजी!
औरंगाबाद शहरातील सिडको भागातील कैलास पावभाजी गेल्या 25 वर्षांपासून फेमस आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातून अनेकजण इथं पावभाजी खायला येतात.
या पावभाजी सेंटरचे मालक कैलास दायरी आहेत.
कैलास पावभाजी सेंटरमध्ये तुम्हाला स्पेशल पाव भाजी, मसाला पाव, खडी पावभाजी, बटर पाव, पुलाव, पाणीपुरी, रगडा हे पदार्थ खायला मिळतात.
गेल्या पंचवीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी ग्राहकांच्या सेवेसाठी पावभाजी सेंटर सुरू केलं. पावभाजीची चव ग्राहकांना खूप आवडली आम्ही ही चव टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करत असतो.
महागाईच्या जमान्यांमध्ये सर्व साहित्य महाग झाले आहे मात्र आजही आम्ही दर्जेदार साहित्य वापरतो त्यामुळे आमची चव टिकून आहे, असं पावभाजी सेंटरचे मालक कैलास दायरी यांनी सांगितलं.
शहरातील सिडको भागामध्ये एन्ट्री एरियात कामगार चौकापासून 100 मीटर अंतरावरती कैलास पावभाजी सेंटर आहे.
हे पावभाजी सेंटर दुपारी साडेबारा ते रात्री साडेदहापर्यंत सुरू असतं यामुळे या वेळेमध्ये तुम्ही चवदार पावभाजीचा आस्वाद घेऊ शकता.