एकाच ठिकाणी खा 13 प्रकारचे कढई पोहे

 नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ भागात कढई पोह्याचे हॉटेल आहे. 

देवेंद्र बैरागी आणि शुभम भोसले या दोन उच्चशिक्षित तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या कढई पोहे हे हॉटेल चांगलेच लोकप्रिय झाले आहे. 

गरमागरम कढई पोहे खाण्यासाठी हे हॉटेल आता सर्वांची पसंती बनलंय. इथं तब्बल 13 प्रकारचे पोहे खायला मिळतात.

13 प्रकारचे पोहे
या हॉटेलमध्ये कांदा पोहे, दडपी पोहे, तर्री पोहे, बटाटा पोहे,दही तडका पोहे, कोकणचे पोहे, 

कढी पोहे, भेळ पोहे,चिवडा पोहे, चीज पोहे,पोहे कटलेट,पोहे चीज बॉल्स असे 13 प्रकारचे पोहे खायला मिळतात.

त्यापैकी तर्री पोहे हा प्रकार ग्राहकांच्या विशेष पसंतीचा आहे, अशी प्रतिक्रिया या हॉटेलचे मालक शुभम भोसले यांनी दिली.

 काय आहे किंमत?
सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात हे पोहे विकले जातात. या हॉटेलमध्ये एक प्लेट पोह्याची किंमत 25 रुपये आहे.