बायकोचं मंगळसूत्र विकून बांधलं गावात स्वच्छतागृह
जालना जिल्ह्यातील डोमेगाव येथील बाबासाहेब शेळके यांनी गावात 200 शौचालये बांधले आहेत.
यासोबत 8500 झाडं त्यांनी लावली आहेत. त्यांची आर्थिक परिस्थिती साधारण आहे.
ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कामाला असून घरी तीन एक शेती आहे.
त्यांच्या आजूबाजूच्या गावात स्वच्छतेची कामं सुरू होती. या कामासाठी त्यांनाही जावं लागत असे.
त्याचवेळी त्यांना आपलं गावही स्वच्छ आणि सुंदर व्हावं असं वाटू लागलं.
शेळके यांनी 2010 पासून गावकऱ्यांना स्वच्छता गृह बांधून देण्यात मदत करणे सुरू केली.
मला या कामासाठी दीड एकर जमीन आणि बायकोचं मंगळसूत्र विकावं लागलंय, अशी माहिती शेळके यांनी दिली.