कोंबडी आईप्रमाणे करतेय मोरांच्या पिल्लांचा सांभाळ!

 नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात एक कोंबडी मोरांच्या पिलांचा आईप्रमाणे सांभाळ करत आहे. 

ऐकवल्यावर चटकन विश्वास बसणार नाही असा प्रकार सध्या प्रत्यक्षात घडतोय.

वनसंरक्षक सुजित निमसे निफाड परिसरात फिरत असताना त्यांना अचानक एका झाडापाशी पाच अंडी दिसली. ही मोराची अंडी असल्याचं त्यांनी ओळखलं. 

 निमसे यांनी ही अंडी वनपाल भगवान जाधव यांना दिली.

जाधव यांनी ही अंडी घरी आणली आणि घरात असणाऱ्या कोंबडीच्या खाल्ली उबवण्यास सुरूवात केली. 

त्यामधून काही दिवसांमध्येच चार पिलांचा जन्म झाला.या जन्मानंतर मोराची पिलं कोंबडीसोबतच राहू लागली.

कोंबडीनंही त्या पिलांना आपल्या पंखाखाली घेत आईची उब दिली. ही पिल्लं आता मोठी होत आहेत. 

ते या कोंबडीला सोडून कुठंही जात नाहीत.आज ही कोंबडी आईसारखी या पिलांची काळजी घेत आहे,असे जाधव यांनी सांगितले.