3 महिन्यात लखपती बनवते चिया शेती!

आणखी पाहा...!

शेती बिनभरवशाचा व्यवसाय मानला जातो. 

काही शेतकरी नवनवीन प्रयोग करून लाखोंचे उत्पन्न मिळवतात.

वर्धा जिल्ह्यातील शेतकरीही आधुनिक शेतीचे प्रयोग करत आहेत.

सेलू तालुक्यातील शेतकरी चिया या औषधी वनस्पतीची शेती करत आहेत.

एका खासगी कंपनीशी करार करून चिया शेती केली जात आहे.

चियाच्या लागवडीसाठी सप्टेंबर ते नोव्हेंबर हा काळ योग्य मानला जातो.

चियाची लागण पेरणीच्या माध्यमातून केली जाते.

एक एकरात चिया पिकवायचे असेल तर सुमारे २ किलो बियाणे लागते.

एक एकर शेतात चिया पीक घेण्यासाठी सुमारे 11 हजार रुपयांचा खर्च येतो. 

बाजारात चिया बियांची किंमत 100 ते 200 रुपये प्रति किलो आहे.

एक एकरातून 3 महिन्यात 4 ते 7 क्विंटल चियाच्या बियांचे उत्पादन निघते.

चिया बिया कोणत्याही प्रकारची माती आणि हवामानात येतात. 

चिया शेतीला चांगल्या निचऱ्याची हलकी आणि वालुकामय जमीन योग्य आहे.

चियाला नवीन काळातील सुपरफूड असेही म्हणतात. 

चिया बिया रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे काम करतात. 

उत्तम आरोग्यासाठी लोक चिया बिया पाण्यात किंवा दुधात मिसळून खातात.