डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली कोल्हापुरी डिश
दाक्षिणात्य पदार्थांना नॉनव्हेजचा तडका दिलेला सध्या बऱ्याच ठिकाणी ऐकायला किंवा पाहायला मिळतो.
कोल्हापूरमध्येही याच प्रकारची एक डिश गेल्या 18 वर्षांपासून मिळते. अंडा डोसा असं या पदार्थाचं नाव आहे.
डोसा आणि अंड्याचं फ्युजन असलेली ही डिश कोल्हापूरकर मोठ्या आवडीनं खातात.
कोल्हापूरच्या शास्त्री नगर रोडवर बेस्ट अंडा डोसा अशी दस्तगीर इलाई भालदार यांची अंडा डोसाचा गाडा आहे.
त्यांनी 2005 साली ऐतिहासिक बिंदू चौकात अंडा डोसा विकण्यास सुरूवात केली. त्यानंतर 2009 पासून आजपर्यंत त्यांचा शास्त्रीनगरच्या चौकात गाडा आहे.
या व्यवसायात त्यांची पत्नी आणि मुलगाही मदत करतात. येथील अंडा डोसा खाण्यासाठी सकाळी 8.30 पासूनच गर्दी सुरू होते दुपारी 2.30 पर्यंत हा गाडा सुरू असतो.
मी सुरूवातीला कुकर, मिक्सर रिपेअर करण्याचं काम करत होतो. त्यानंतर फक्त साधा डोसा विकायला सुरूवात केली.
त्यावेळी काहीतरी नवा पदार्थ बनवण्याचा विचार मी केला. त्यामधूनच या डिशची कल्पना सुचली, असं दस्तगीर भालदार यांनी सांगितलं.
कसा बनवतात अंडा डोसा ?
सध्या डोश्याला अंड्याचे ऑम्लेटचा टच देऊन हा अंडा डोसा बनवला जातो. सुरुवातीला तव्यावर साधा डोसा तयार करून घेतला जातो.
मग ते व्यवस्थित एकत्र करून डोश्यावर सगळीकडे पसरवले जाते. अशा प्रकारे हा अंडा डोसा तयार होतो.
कुठं खाणार अंडा डोसा?
शास्त्रीनगर चौक, शास्त्रीनगर चौक, यादव नगर मेन रोड, कोल्हापूर, 416008