सरकारी शाळांतील शिक्षक विद्यार्थीकेंद्री शिक्षणास प्राधान्य देत आहेत.
सांगली मनपा शाळेतील संतोष यादव हे उपक्रमशील शिक्षक आहेत.
मिरजेतील मनपा शाळा क्र. 1 मध्ये विविध उपक्रम घेतले जातात.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करीत क्यूआर कोड शिक्षण प्रणालीची निर्मिती केली आहे.
QR कोडमुळे शिक्षण प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी सोपी आणि सुलभ झाली आहे.
QR कोडद्वारे अध्यापन करणारी राज्यातील पहिली मनपा शाळा आहे.
यादव यांनी सन 2021 पासून शाळेत विविध उपक्रम राबवले.
आठवडी बाजार, परसबाग, पुस्तकांची गुढी, कोरोनाची होळी हे उपक्रम राबविले.
MY NAME ON MY HAND, माझे शरीर - माझा योग हे उपक्रम विद्यार्थीप्रिय ठरले.
ज्ञानाची हंडी, रक्षाबंधन-वृक्षाबंधन आदी उपक्रमात विद्यार्थी सहभागी झाले.
ज्ञानाचा दीपोत्सव, शब्दांचा खजिना अशा उपक्रमांचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय.
महिला सबलिकरणासाठी आम्ही सावित्रीच्या लेकी सारखे उपक्रम राबविले.
क्यूआर मुळे इतिहास, भूगोल, भाषा विषयाशी संबंधित शिक्षण सोपे झाले
मुख्याध्यापिका सविता पवार व अन्य शिक्षकांमुळे शाळा विद्यार्थीप्रिय ठरत आहे.